LIC IPO Marathi News Arthvarta
हायलाइट्स (Investment in LIC IPO | LIC IPO Date | LIC IPO Details)
- एलआयसी पॉलिसीधारकाला प्रति शेअर 60 रुपये सूट मिळेल.
- हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 85-90 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे.
- LIC चे शेअर्स 17 मे रोजी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होतील.
एलआयसीचा IPO उद्या म्हणजेच बुधवारी उघडत आहे. देशातील सर्वात मोठा आणि जगातील पाचवा सर्वात मोठा IPO असल्याने त्याची खूप चर्चा होत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारकही या बहुप्रतिक्षित IPO बद्दल उत्सुक आहेत कारण त्यांच्यासाठी वेगळी सूट जाहीर करण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनाही सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या IPO मध्ये गुंतवणूक करणार असाल, तर आम्ही त्याच्याशी संबंधित 10 महत्वाची माहिती देत आहोत, ज्या जाणून घेऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो.
1. तुम्ही IPO मध्ये कधी गुंतवणूक करू शकाल? (When can you invest in LIC IPO?) : LIC चा IPO उद्या म्हणजेच 4 मे रोजी उघडत आहे. 4 मे ते 9 मे दरम्यान तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.
2. किती गुंतवणूक करावी? (How much to invest?): भारत सरकारने LIC IPO प्राईस बँड रु.902 ते रु.949 प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे. म्हणजेच, जर तुम्ही एक लॉट IPO साठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 14,235 रुपये द्यावे लागतील.
हेही वाचा- Wipro Q4 Results: नफा 4% वाढून 3092 कोटी, महसूलही मजबूत!
3. सरकार किती पैसे उभारणार? (How much money will the government raise?): सुमारे 21 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची तयारी आहे. सरकार LIC मधील 3.5 टक्के हिस्सा विकत आहे. हा Issue पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS Offer for Sell) आहे. म्हणजे ह्या इश्यू तून जी रक्कम मिळेल ती सरकारचीच असेल.
4. पॉलिसीधारकाला किती सूट मिळेल? (How much discount will the policyholder get?): भारत सरकारने एलआयसी पॉलिसीधारकाला प्रति शेअर 60 रुपये सूट देण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 45 रुपये सूट मिळेल.
5. या IPO चा उद्देश काय आहे? (What is the purpose of this IPO?): सरकारला LIC ला बाजारात लिस्ट करायचे आहे. या कंपनीतील आपली हिस्सेदारी हळूहळू कमी करण्याची त्यांची योजना आहे.
6. ग्रे मार्केटमध्ये किती प्रीमियम चालू आहे? (What is the current premium in the gray market?): ग्रे मार्केटमध्ये या स्टॉकवर 85-90 रुपये प्रीमियम चालू आहे. गेल्या बुधवारी इश्यू जाहीर झाल्यानंतर ग्रे मार्केटमधील प्रीमियम खूपच कमी होता.
हेही वाचा- GRM Overseas: या मल्टीबॅगर स्टॉकने केले गुंतवणूकदारांना श्रीमंत, दिला 147% छप्परफाड परतावा !
7. कोणत्या तारखेला IPO सूचीबद्ध होईल? (On what date will the LIC IPO be listed?): LIC चे शेअर्स 17 मे रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील.
8. अँकर गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कसा होता? (How was the response from anchor investors?): अँकर गुंतवणूकदारांचा कोटा सोमवारी (2 मे) पूर्ण झाला. एलआयसीने शेअर बाजारांना ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की अँकर पोर्शनची 71 टक्के गुंतवणूक म्युच्युअल फंडातून आली आहे.
9. LIC IPO मध्ये अर्जाची मर्यादा? (Application limit in LIC IPO?): बोली लावणारा किमान एक लॉटसाठी अर्ज करू शकतो तर कमाल 14 लॉटला परवानगी आहे.
10. कोण आहेत अँकर गुंतवणूकदार? (Who are the anchor investors?): अनेक मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये सिंगापूर सरकार (Government of Singapore), गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल (Government Pension Fund Global), बीएनपी इन्व्हेस्टमेंट एलएलसी (BNP Investment LLC), सिंगापूरचे चलन प्राधिकरण (Monetary Authority of Singapore ) आणि सोसायटी जनरल (Societe Generale) यांचा समावेश होता.
याशिवाय SBI म्युच्युअल फंड (SBI Mutual Fund), ICICI प्रुडेन्शियल (ICICI Prudential), SBI लाइफ इन्शुरन्स (SBI Life Insurance), L&T म्युच्युअल फंड (L&T Mutual Fund), टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (TATA Investment Corporation), UTI म्युच्युअल फंड (UTI Mutual Fund), सुंदरम म्युच्युअल फंड (Sundaram Mutual Fund), IDFC MF आणि Bajaj Allianz General Insurance यांचा समावेश आहे.
अर्थवार्ता मराठी मध्ये ब्रेकिंग न्यूज वाचणारे पहिले व्हा | आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्या अपडेट्स, वाचा सर्वात विश्वसनीय मराठी बातम्या वेबसाइट Arthvarta.com Marathi |
फ्री मराठी कोर्स लिंक —>> शेअर बाजाराची ओळख (Introduction to Stock Markets) » Arthvarta
अर्थवार्ता टेलिग्राम —>> ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर !
,